सातेफळ येथे दर वर्षी प्रमाणे श्री रेणुका देवी यात्रा महोत्सवाचे दि. 21 एप्रिल 2025 ते 23 एप्रिल 2025 रोजी आयोजन करण्यात आले.
केज
रेणुका देवी हे भारतातील प्रमुख ५१ शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे. या देवीला ‘एकवीरा’, ‘यमाई’, ‘येल्लुआई’ तसेच ‘येल्लम्मा’ अशा विविध नावाने विविध प्रांतात संबोधले जाते. ही देवी आदिशक्तीचे प्रकट रूप महाकाली म्हणून पूजली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू व काश्मीर ह्या राज्यात रेणुका देवीचे उपासक प्रामुख्याने आढळतात.
महाराष्ट्रात माहूरगडाव्यतिरिक्त दैत्यसंहारासाठी व भक्त कल्याणासाठी रेणुकामाता यमाई, एकविरा, मोहटादेवी, पद्माक्षी रेणुका अशा नानाविविध अवतारांत प्रकट झाली. रेणुका देवीला “साऱ्या जगाची आई” अर्थात “जगदंबा” मानतात. रेणुका माता ही क्षत्रिय, ब्राह्मण, आदिवासी व पतीतांची माता व रक्षक म्हणून सर्वांकडून पूजली जाते. त्याचबरोबर कोळी, आगरी लोकांची आई म्हणून’तिचे एकवीरा हे रूप प्रसिद्ध आहे.
‘रेणुका’ ही इक्ष्वाकु वंशातील रेणु नावाच्या महाराजाची कन्या, आणि जमदग्नी ऋषीची पत्नी होती. या जोडप्याला पाच मुलगे होते, त्यातील एक हे भगवान परशुराम आहेत. सप्त चिरंजीवांपैकी असलेले भगवान परशुराम हे अजूनही महेंद्र पर्वतावर गुप्त स्वरूपात तप करत आहेत अशी मान्यता आहे.
सातेफळ येथे दर वर्षी प्रमाणे श्री रेणुका देवी यात्रा महोत्सवाचे दि. 21 एप्रिल 2025 ते 23 एप्रिल 2025 रोजी आयोजन करण्यात आले. देवीच्या गाड्या ओडणे, देवीचा छबिना, शोभेची दारू, आराधी मंडळाची गाणी, तसेच कुस्त्या शेवटची कुस्ती 4100रू झाली, बैल गाडा शर्यत हे कार्यक्रम कमिटी व सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने, तसेच गावातील सर्व तरुण मंडळाने अतिशय मेहनत व नियोजन करून सर्व कार्यक्रम पार पाडले. गावकऱ्यामुळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी, माजी पदधिकारी, सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्यामुळे व प्रशासनाच्या सहकार्यामुळे सर्व काही व्यवस्थित झाले. तसेच मांगवडगाव, हदगाव, डोका, साळेगाव, कळंब, माळेगाव येथील लोक यात्रेला येतात. व कार्यक्रमाची शोभा वाढवतात. त्यामुळे सर्वांचे खूप खूप आभार ग्रामस्थ व सरपंच कृष्णा सोपान थोरात यांच्याकडून मानण्यात आले.