हम डरेंगे नही और हम हटेंगे भी नही — अभिजीत दरेकर
”शिंदे साहेब क्या चीज है, आज पता चला !” हे वाक्य आहे जम्मू आणि कश्मीर मधील एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याचं. मंगळवारी दुपारच्या सुमारास न्यूजचॅनलवर बातम्या पाहिल्या. कश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची ती बातमी होती. बातमी पाहताच मनात धस झालं. पुरेशी माहिती मिळत नव्हती. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होते. अशातच बातमी आली की यात महाराष्ट्राचे अनेक पर्यटक आहेत. ही बातमी पाहिली आणि काळजाचा ठोका चुकला.
तितक्यात फोन वाजू लागले. अनेक मेसेज येऊ लागले. त्यातच एक फ़ोन होता आमचे मार्गदर्शक कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेबांचा. संपूर्ण घटनेवर बारीक लक्ष ठेवा आणि तातडीने कश्मीरकडे निघ असा संदेश होता. काही वेळात उप मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचा फोन आला. आपल्याला कश्मीरमध्ये आपल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी टीम पाठवायची आहे. लवकरच निघा असा त्यांचा स्पष्ट संदेश होता. शिवसेनेत आदेश म्हणजे आदेश.
दुसऱ्याच क्षणाला कश्मीरमध्ये जाण्याची तयारी केली आणि निघालो. डोंबिवलीतील तिघांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला ही बातमी वेदनादायी होती. मृतांचे कुटुंबिय आणि नातलग संपर्कात होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी श्रीनगर मध्ये पोहोचलो आणि तेथील उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कशी मदत करता येईल हे समजून घेतले. महाराष्ट्रातून शेकडो पर्यटक जम्मू कश्मीरमध्ये आले होते. हल्ल्याच्या घटनेनंतर सगळ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होतं. अनेक जण भेदरले होते. त्यांच्या चेहऱ्यावर हल्ल्याचे पडसाद स्पष्टपणे दिसत होते. सर्वांना तिथून निघायचं होतं. देशाचं नंदनवन, ज्याचं सौंदर्य पाहण्यासाठी अनेक महिने तयारी करून जिथे पर्यटक येतात, त्या काश्मिरात भीतीच वातावरण पहिल्यांदाच पाहिलं. जशी माहिती मिळाली तसतशी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन महाराष्ट्रतील कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना धीर दिला. त्यांना आश्वासन दिलं की लवकरच तुमची सुटका होणार आहे. काही जणांचे दोन-तीन दिवस पुढचे विमान तिकीट होते. या सर्व गोंधळात काहींची ट्रेन सुटली तर काहींचे विमान. या सर्वांची व्यवस्था करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे होते. त्यानुसार सर्व व्यवस्था केली.
आपले लोक संकटात असताना एकदम शिंदे साहेब महाराष्ट्रात शांत बसतील तर ते शिवसैनिक कुठले. बुधवारी रात्रीच शिंदे साहेबांनी श्रीनगर गाठलं. शिंदे साहेबांना पाहतच आपला एखादा नातलगच आपल्याला भेटायला आला आहे अशा भावनेतून अनेक जण भावुक झाले. आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा होती तर डोळ्यात आनंदाश्रू होते. ही वेळ नाजूक असली तरी आणि त्यांच्या मनात एका शिंदे साहेबांबद्दल दृढ विश्वास होता. तो विश्वास सत्यात उतरताना प्रत्यक्ष पाहण्याची अनुभूती मिळाली. शिंदे साहेबांनी महाराष्ट्राला वेळोवेळी प्रेम दिले, महाराष्ट्रातील बांधवांची काळजी घेतली, महाराष्ट्र असो किंवा कश्मीर दोन्ही ठिकाणी शिंदे साहेबांचं आपल्या लोकांवरचं प्रेम किंचितही कमी झालेल दिसल नाही. सर्वांची आस्थेने विचारपूस करून त्या सर्वांसाठी परतीचा मार्ग शिंदे साहेबांनी सुसज्ज केला. गुरुवारी रात्री शेकडो पर्यटकांची विमाने मुंबईत उतरले आणि मुंबईतून जागोजागी जाण्याचे पर्याय ठेवले, पहिल्या दिवशी ज्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत घटनेची परिस्थिती आणि बचाव कार्य कसे करता येईल यावर चर्चा करत होतो. त्यावेळी एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला प्रश्न विचारला. कहा थे, किस डेड बॉडी के साथ रुके थे. त्यांना मी सांगितलं की, मै महाराष्ट्र से आया हू रात को, त्यावर ते म्हणाले… अरे तुम पागल हो क्या ? सारे टुरिस्ट यहा डर से भागने मे लगे है और तुम यहाँ वापिस आ रहे हो. मी सांगितलं, एकनाथ शिंदे और सांसद श्रीकांत शिंदे साहब का ऑर्डर है तो आना ही पडेगा, हम डरेंगे नही और हम हटेंगे भी नही.त्यावर ते म्हणाले शिंदे साहेब के बारे में बहुत सुना था, लेकिन आज पता चला शिंदे साहब क्या चीज है ! एका दूरच्या राज्यातल्या अनोळखी उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या तोंडून हे वाक्य ऐकून ऊर अभिमानाने भरून आला. शिवसेना आणि शिवसैनिकाची ताकद काय असते हे बाळासाहेबांच्या माध्यमातून जगभर पसरलेच पण एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना आणि शिवसैनिकाची ही ओळख कायम टिकवून ठेवली आहे, हे मात्र त्रिवार सत्य आहे.